Sat. Jul 27th, 2024

Ayushman Bharat Card: रेशन दुकानातही मिळणार आयुष्यमान भारत कार्ड;

Ayushman Bharat Card : तालुक्यात आता ग्रामपंचायतीबरोबरच रेशन दुकानातही आयुष्यमान भारत कार्ड काढून मिळणार आहे. याबाबत तालुक्यातील १७४ रेशन दुकानदारांना तहसील कार्यालयात प्रशिक्षण देण्यात आले.

सेतू केंद्रांची संख्या अत्यल्प असल्याने नागरिकांची आयुष्यमान भारत कार्ड काढण्यासाठी पायपीट होत होती. याची दखल घेऊन तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी बुधवारी (ता. २७) तालुक्यातील सर्व रेशन दुकानदारांना आयुष्यमान भारत कार्ड काढण्याचे प्रशिक्षण दिले. (Ayushman Bharat card will be available in ration shops jalgaon news)

आयुष्यमान भारत कार्डचे लाभार्थी हे रेशन दुकानातून धान्य घेणारे लाभार्थी असल्याने रेशन दुकानदार त्यांचे थम इम्प्रेशन घेऊन स्थानिक पातळीवर प्रकिया पूर्ण करू शकतील. धान्य वितरीत करताना जी प्रणाली अवलंबली जाते, त्याच प्रणालीने आयुष्यमान भारत कार्ड काढण्याची प्रक्रिया पूर्ण होणार असल्याने रेशन दुकानात तत्काळ आयुष्यमान भारत कार्ड मिळू शकते. आयुष्यमान भारत कार्ड असणाऱ्या नागरिकांना नोंदणीकृत हॉस्पिटलमध्ये पाच लाख रुपयांपर्यंत शुल्क माफ आहेत.

प्रशिक्षण प्रसंगी तहसीलदार नानासाहेब आगळे, गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे, पुरवठा अधिकारी विवेक वैराळकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. पल्लवी राऊत, डॉ. नरेश पाटील, आरोग्य विस्तार अधिकारी सुनील सूर्यवंशी, आरोग्य पर्यवेक्षक बशीर पिंजारी, रवींद्र सूर्यवंशी, हेमंत पाटील, स्वप्नील महाजन, किशोर पाटील, धीरज पाटील, रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष तेजराव ठोंबरे, सचिव राजेंद्र देशपांडे, सर्व रेशन दुकानदार, सर्व आरोग्यसेवक व गटप्रवर्तक ज्योती पाटील, अर्चना टोके, सविता कुमावत, यमुना जाधव आदी उपस्थित होते.

“रेशन दुकानावर आयुष्यमान भारत कार्ड मिळणार असल्याने नागरिकांची पायपीट थांबणार आहे. त्यांना लवकर कार्ड मिळतील. लाभार्थ्यांनी लवकरात लवकर आयुष्यमान भारत कार्डसाठी नोंदणी करावी.” – नानासाहेब आगळे, तहसीलदार, जामनेर.

”जामनेर तालुक्यातील ग्रामपंचायतीबरोबरच रेशन दुकानात आयुष्यमान भारत कार्ड मिळणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळेल. तालुक्यातील सर्व कार्ड जानेवारीअखेर काढून पूर्ण होतील.” – डॉ. राजेश सोनवणे, तालुका वैद्यकीय अधिकारी, जामनेर.

सर्व update साठी व PDF file साठी What’s app group जॉईन करा 👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va93j2zJJhzaKxMLHn0y

दहावी बारावी बोर्ड परीक्षा नोट्स साठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇

https://chat.whatsapp.com/KZAwjhVZOUv4JZQW5sWHuh

Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/

पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation

https://youtube.com/c/nanafoundation

Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7

PDF file साठी खालील  🔗 लिंक वर क्लिक करा
     https://t.me/n_f07 

Click on 🔗 link below for PDF file

https://t.me/n_f07

Click on the link below to watch the full info video🎦📺

https://youtube.com/c/nanafoundation

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *