Sat. Jul 27th, 2024

Career Tips : बारावीनंतर करा ‘हे’ बेस्ट कोर्स, नोकरीची मिळेल उत्तम संधी.

Career Tips : सध्याच्या घडीला बदलत्या काळानुसार शिक्षणामध्ये आणि विविध क्षेत्रांमध्ये सातत्याने बदल होताना दिसत आहे. करिअरची विविध क्षेत्रे खुली झाल्यामुळे विद्यार्थी देखील नव्या करिअर वाटांना त्यांच्या आवडीनुसार प्राधान्य देताना दिसत आहे…

विद्यार्थ्यांचा या नव्या क्षेत्रांकडे कल वाढल्यामुळे नोकरीच्या अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. परंतु, अनेकवेळा नोकरीची हमखास संधी असलेल्या अभ्यासक्रमाला प्रवेश कसा घ्यायचा? असा अनेक विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो.

मात्र, तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच काही कोर्सेसबद्दल सांगणार आहोत. जे नोकरीसाठी बेस्ट आहेत. चला तर मग जाणून घेऊयात या कोर्सबद्दल.

बिझनेस मॅनेजमेंट कोर्स
मागील २-३ वर्षांपासून बिझनेस मॅनेजमेंट या कोर्सला प्रचंड डिमांड आहे. बिझनेस मॅनेजमेंटमध्ये बीबीए, एमबीए, सीए इत्यादी अनेक कोर्सेस तुम्ही करू शकता. हे कोर्स केल्यानंतर तुम्हाला नोकरीच्या अमाप संधी निर्माण होतात. शिवाय, तुम्हाला चांगला पगार ही मिळू शकतो.

फॅशन डिझायनिंग
मागील काही वर्षांपासून फॅशन डिझायनिंग या क्षेत्राला प्रचंड मागणी वाढली आहे. सध्या हा कोर्स ट्रेंडिंगमध्ये देखील आहे. कारण, या क्षेत्रात नोकरीच्या अमाप संधी आता उपलब्ध झाल्या आहेत. शिवाय, हा कोर्स करून विद्यार्थी त्यांचे स्वत:चे बुटिक देखील सुरू करू शकतात. तरूणींसोबत आता तरूण देखील या क्षेत्राचा विचार करताना दिसत आहेत.

फॅशन डिझायनिंगमध्ये तुम्ही डिप्लोमा किंवा डिगरी देखील करू शकता. अनेक मान्यताप्राप्त संस्थांमध्ये, विद्यापीठांमध्ये आणि कॉलेजेसमध्ये हे कोर्सेस उपलब्ध आहेत.

कम्प्युटर अ‍ॅप्लीकेशन
सध्याचे युग हे डिजिटल युग आहे. त्यामुळे, झपाट्याने बदलणाऱ्या या युगात आता सर्व काही कामे संगणक, टॅब आणि मोबाईलच्या माध्यमातून होताना दिसत आहेत. त्यामुळे, कम्प्युटर आणि त्याच्या निगडीत कोर्सेसमध्ये नोकरीच्या अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. 

तुम्ही पदवीनंतर, बी. टेक किंवा एनआयआयएमची परीक्षा देऊन बारावीनंतर कम्प्युटर अ‍ॅप्लीकेशन कोर्स करू शकता. हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला चांगला पगार देखील मिळू शकतो.

सर्व update साठी व PDF file साठी What’s app group जॉईन करा 👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va93j2zJJhzaKxMLHn0y

दहावी बारावी बोर्ड परीक्षा नोट्स साठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇

https://chat.whatsapp.com/KZAwjhVZOUv4JZQW5sWHuh

Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/

पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation

https://youtube.com/c/nanafoundation

Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7

PDF file साठी खालील  🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07

Click on 🔗 link below for PDF file

https://t.me/n_f07

Click on the link below to watch the full info video🎦📺

https://youtube.com/c/nanafoundation

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *