SIM कार्ड घेण्यासाठी आता आधार कार्ड, पॅन कार्ड नेण्याची गरज नाही; १ जानेवारीपासून नियम बदलणार
डिपार्टमेंट ऑफ टेलिकॉमनं (डॉट) एक स्वागतार्ह निर्णय घेत घोषणा केली आहे की मोबाइल युजर एनरोलमेंटसाठी आता पेपर बेस्ड KYC ची गरज नाही. हा बदल १ जानेवरी २०२४ पासून अंमलात आणला जाईल. त्यामुळे टेलिकॉम कंपन्यांची प्रोसेस सुधारेल, खर्च कमी होईल तसेच सिम फ्रॉड कमी होतील… असे मत आहे
सध्या जी प्रोसेस आहे ज्यात अनेक कागदी फॉर्म भरावे लागतात, फोटो द्यावा लागतो आणि ओळखीचा तसेच पत्त्याच्या पुराव्याच्या कॉपी द्याव्या लागतात. ह्या प्रोसेसची जागा पूर्णपणे डिजिटल केव्हायसी घेईल. त्यामुळे आता सिमकार्ड घेण्यासाठी सिमकडं आधारकार्ड, पॅनकार्ड इत्यादी पुरावे सोबत नेण्याची गरज नाही तुम्ही डिजिलॉकर सारख्या अॅप्सचा देखील वापर करू शकतो…
DoT नं जाहीर केलं नोटिफिकेशन
सध्याच्या केव्हायसी फ्रेमवर्कमध्ये वेळोवेळी अनेक बदल करण्यात आले आहेत, त्यामुळे आता ९ ऑगस्ट २०१२ च्या सूचनेनुसार सुरु असलेली पेपर बेस्ड केव्हायसी प्रोसेस १ जानेवारी २०२४ पासून बंद केली जाईल, असं डिपार्टमेंट ऑफ टेलीकॉम्युनिकेशननं मंगळवारच्या नोटिफिकेशनमध्ये म्हटलं आहे. इंडस्ट्रीमधील एक्सपर्ट्सच्या मते ह्या बदलामुळे टेलिकॉम कंपन्यांचा ग्राहक मिळवण्याचा खर्च कमी होईल तसेच फसवणुकीच्या घटना कमी करण्यासाठी सरकारला देखील मदत होणार आहे
ह्याआधी ऑगस्ट २०२३ मध्ये टेलिकॉम डिपार्टमेंटनं एक घोषणा केली होती, ज्यात सिम कार्ड विक्री करणाऱ्या विक्रेत्यांसाठी नियम कडक करण्यात आले होते. त्यामुळे सिम कार्ड विक्रेत्यांकडून होणाऱ्या फ्रॉडला आळा बसेल, असा उद्देश आहे. हे नवीन नियम १ डिसेंबरपासून लागू झाले आहेत.
Airtel, Reliance Jio आणि Vodafone-Idea साठी खुशखबर
केव्हायसीच्या नव्या नियमांमुळे टेलिकॉम कंपन्यांना मोठा फायदा होणार आहे. पेपर बेस्ड केव्हायसी रद्द झाल्यामुळे डिजिटल केव्हायसी युजर एनरोलमेंटचा खर्च कमी करेल. तसेच सरकारला सिम कार्ड फ्रॉडवर लक्ष ठेवण्यास देखील मदत होईल. सर्वच टेलिकॉम कंपन्यांनी अनेकदा आपल्या ग्राहकांना सिम कार्ड संबंधित स्कॅम्सची सूचना दिली आहे.
सर्व update साठी व PDF file साठी What’s app group जॉईन करा 👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va93j2zJJhzaKxMLHn0y
दहावी बारावी बोर्ड परीक्षा नोट्स साठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇
https://chat.whatsapp.com/D2TUqZEc53mLg9lfvVI1iJ
Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/
पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation
https://youtube.com/c/nanafoundation
Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7
PDF file साठी खालील 🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07
Click on 🔗 link below for PDF file
Click on the link below to watch the full info video🎦📺
https://youtube.com/c/nanafoundation